State Cabinet Portfolio भाजपचे जयकुमार रावल राज्याचे नवे पणन मंत्री ;
राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गृह खातं स्वत:कडंच ठेवलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाते सोपवण्यात आली आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं पुन्हा एकदा अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 33 कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्र्यांनी रविवारी (16 डिसेंबर) शपथविधी झाला होता. त्यानंतर सहा दिवसांनी हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
#राज्य मंत्रिमंडळच संपूर्ण खातेवाटप
1-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क
2-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण
3-उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ आणि नियोजन, उत्पादनशुल्क
4-चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
5-राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
6-हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
7-चंद्रकांत पाटील - उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, विधीमंडळ कामकाद
8-गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन
9-गुलाबराव पाटील - जलपुरवठा आणि स्वच्छता
10-गणेश नाईक - वन
11-दादा भुसे - शालेय शिक्षण
12-संजय राठोड - मृदा आणि पाणी संवर्धन
13- धनंजय मुंडे - अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
14-मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार
15-उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषा
16-जयकुमार रावल - विपणन आणि राजशिष्टाचार
17-पंकजा मुंडे - वन आणि हवामान बदल, पशुपालन
18-अतुल सावे - ओबीसी कल्याण, दुग्धविकास आणि अक्षय्य ऊर्जा
19-अशोक उईके - आदिवासी विकास
20-शंभूराज देसाई - पर्यटन, खाण आणि माजी सैनिक कल्याण
21-आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक घडामोडी
22-दत्तात्रय भरणे - क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास, वक्फ
23-आदिती तटकरे - महिला आणि बालकल्याण
24-शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
25-माणिकराव कोकाटे - कृषी
26-जयकुमार गोरे - ग्रामीण विकास आणि पंचायत राज
27-नरहरी झिरवळ - अन्न आणि औषध प्रशासन
28-संजय सावकारे - वस्त्रोद्योग
29-संजय शिरसाट - सामाजिक न्याय
30-प्रताप सरनाईक - परिवहन
31-भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन
32-मकरंद पाटील - मदत आणि पुनर्वसन
33-नितेश राणे - मत्स्यपालन आणि बंदरे
34-आकाश फुंडकर - कामगार
35- बाबासाहेब पाटील - सहकार
36-प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
1-माधुरी मिसाळ - शहरविकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास, वक्फ
2-आशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्नसन, कायदा आणि सूव्यवस्था, कामगार
3-पंकज भोयर - गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खणिकर्म
4-मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, महिला आणि बालकल्याण
5-इंद्रनील नाईक - उद्योग, उच्च आणि तांत्रिक शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन
6-योगेश कदम - गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न आणि नागरीपुरवठा