"टोमॅटो खाणं बंद करा, त्याऐवजी लिंबू वापरा - किंमती कमी होतील" भाजपा मंत्र्याचा अजब सल्ला
टोमॅटोचे (Tomato) भाव वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून तो गायब झाला आहे. मध्यमवर्गीय टोमॅटोचे दर पुन्हा स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. त्यातच आता, उत्तर प्रदेशच्या महिला विकास आणि बाल पोषण राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला यांनी लोकांना टोमॅटो खाऊ नका असा सल्ला दिला. टोमॅटो महाग असल्यास ते घरीच पिकवा किंवा ते खाणे बंद करा असं प्रतिभा शुक्ला यांनी म्हटलं आहे. प्रतिभा शुक्ला यांनी उत्तर प्रदेशच्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला आणि रोपे लावली. यावेळी त्यांनी हे विधान केलं.
"जर टोमॅटो महाग झाले असतील, तर लोकांनी ते घरी पिकवले पाहिजे. जर तुम्ही टोमॅटो खाणं बंद केलं तर किंमती आपोआप कमी होतील. तुम्ही टोमॅटोच्या जागी लिंबूही खाऊ शकता. जर कोणीच टोमॅटो खात नसेल तर किंमती कमी होतील," असं प्रतिभा शुक्ला म्हणाल्या आहेत.