Sweet potato : महशिवरात्रीसाठी मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधे रताळीची मोठी आवक
 
- महाशिवरात्रीनिमित्त मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधे   गेल्या तीन दिवसांपासून रताळ्यांची सुमारे ६ हजार गोणी आवक झाली.
Sweet potato:महाशिवरात्रीनिमित्त मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमधे   गेल्या तीन   दिवसांपासून रताळ्यांची सुमारे ६ हजार   गोणी आवक झाली. गावरान रताळ्यांना किलोला ४५ ते ५२ तर हायब्रीड रताळ्यांना २५ ते ३० रुपये दर मिळाला.
रताळ्यांची माहिती घाऊक व्यापारी श्यामराव मोहिते पाटील   यांनी दिली. ते म्हणाले,‘‘आज   महाशिवरात्री आहे. त्यानिमित्त तीन   दिवसांपासून कराड, करमाळा, सोलापूर, मलकापूर भागातून रताळ्यांची आवक झाली. ही आवक गेल्या तीन दिवसांत ६ हजार गोणी होती. गावरान रताळ्यांना किलोला ४५ ते ५२ रुपये किलोने विक्री होत आहे.
गावरान रताळ्यांची आवक होतेय कमी
गावरान रताळी चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायाला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून त्यांना जास्त मागणी असते. मात्र, मागील काही वर्षांचा विचार केल्यास दिवसेंदिवस गावरान रताळ्यांची आवक कमी होत चालली आहे तर हायब्रीड रताळाची आवक वाढली आहे .