राज्यभरात पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज, 17 हजार पदांसाठी 17 लाख अर्ज
मुंबई: राज्यभरात विविध पदांसाठी पोलीस भरती घेतली जाणार आहे. उद्या सर्व जिल्ह्यात भरती राबवली जाणार असून 17 हजार पदांसाठी 17 लाख अर्ज आले आहेत. यासाठी राज्यातील पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.   पोलीस कॉन्सटेबलसह पाच पदांसाठी भरती घेतली जाणार असून एकूण 17 हजार पदं असणार आहेत. पदभरतीसाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावीपर्यंत आहे. या भरतीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे.
उमेदवार दोन ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत पण दोन वेगळ्या पदासाठी करु शकतो. सर्व उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी होणार नाही. विशेष म्हणजे सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस पडेल तिथं भरतीची प्रक्रिया थांबवली जाईल. ज्या दिवशी पाऊस नसेल तेव्हा भरती प्रक्रिया घेतली जाणार अशीही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात विविध १७ हजार पदे रिक्त होती यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत
सुरीबातीला उमेदवारांची ओळखपत्र तपासले जातील .उमेदवारांचे शैक्षणिक कायदपत्र तपासल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल. उमेदवारांची हजेरी घेऊन छाती / उंची मोजमाप करुन कागदपत्र तपासण्यात येतील व बायोमॅट्रीक हजेरी घेऊन उमेदवारांना त्यांचा चेस्ट क्रमांक वाटप करुन शारिरीक चाचणी करीता मैदानावर पाठविण्यात येईल. मैदानावर उमेदवारांची शारिरीक चाचणीमध्ये पुरुषाची 100 मीटर / 1600 मीटर व महिलांची 100 मीटर/800 मीटर धावण्याची चाचणी कृत्रिम धावपट्टी SYNTHETIC TRACK वर घेण्यात येईल. त्यामध्ये उमेदवारांना SPIKE SHOES वापरता येणार नाही. चंद्रपुरात भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्याकरीता RFID पध्दतीचा वापर करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे. जर पावसामुळे मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची तारीख दिली जाईल .
एकूण पदं - 17 हजार 471 अर्ज - 17 लाख 76 हजार 256
            पद                               रिक्त जागा           अर्जदारांची संख्या
* पोलीस कॉन्स्टेबल           9595                   8,22,984
* चालक                           1686                   1,98,300
* बँड्समॅन                         41                     32,026
* एसआरपीएफ                   4349                 3,50,592
* कारागृह हवालदार           1800                   3,72,354
* एकूण                             17,471             17,76,256