“माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना विधानपरिषदेवर घ्या” माथाडी कामगाराने केलं देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी.
मुंबई:   12 जुलै रोजी होणा-या आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता पार्टीच्यावतिने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी व विधानपरिषदेत शेतकरी, कामगार व जनतेच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याची संधी द्यावी, या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह मंत्री   देवेंद्र फडणवीस यांना संह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेऊन माथाडी कामगार- कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
यावेळी माथाडी कामगार-कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नरेंद्र   पाटील हे लढवय्ये नेते आहेत, ते आजही एक पाऊल पुढे आहेत आणि उद्याही एक पाऊल पुढेच रहाणार आहेत, त्यांचेकडे कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष पद असून, उत्तरोत्तर त्यांनी महामंडळाच्या कार्याला प्रगतीपथावर नेले आहे, याचा निश्चितच विचार केला जाईल आणि त्यांना भारतीय जनता पक्षाच्यावतिने आगामी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, तसेच यापुढे त्यांचेवर याहीपेक्षा मोठी जबाबदारी सोपविली जाईल व सरकार कामगारांचे न्याय्य प्रश्न सोडविण्यासाठी यापुढेही तत्पर राहिल, असे अभिवचन माथाडी कामगार- कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळास दिले.
नरेंद्र पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस व शिष्टमंडळासमोर बोलताना माथाडी कामगार हा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले व मला महाराष्ट्र विधानपरिषदेवर घेण्याची मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली असली तरी त्याबरोबर नवी मुंबईतील बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केट व इतर मार्केट आवारातील प्रश्न, नाशिक येथिल बाजार समित्यांमधील माथाडी/मापारी कामगारांचा प्रश्न तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय मागण्याची सोडवणुक होणे आवश्यक आहे, या प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहोत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडून माथाडी कामगारांच्या न्याय प्रश्नांची सोडवणुक होण्यास सातत्याने प्रयत्न केले जातात.
माथाडी कामगार-कार्यकर्त्यांच्या या शिष्टमंडळामध्ये माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील तसेच सेक्रेटरी आणि विविध विभागातील कामगार-कार्यकर्ते उपस्थित   होते.