आतापर्यंतची सगळ्यात मोठी दुर्घटना ; २८० मृत्यू ९०० जखमी बचावकार्य सुरूच
 
भुवनेश्वर :ओडिशातील बालासोर संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात २८० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ९०० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात स्थळी ओडीशातील स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफचे बचाव पथक पोहचले असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती ओडीशाचे सचिव प्रदीप जेना यांनी माध्यमांना दिली आहे. सध्या आमचं लक्ष केवळ बचावकार्याकडे आहे. रेल्वे, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची बचाव कार्य सुरू आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. विरोधी पक्षाने रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हावडा-चेन्नई कोरोमंडळ एक्सप्रेसचे काही डब्बे रुळावरून घसरले. मात्र त्यानंतर काही क्षणातच समोरून मालगाडी आली येऊन एक्सप्रेसला धडकली. त्यामुळे भीषण अपघात झाला. सिंगलवरील गडबडीमुळे हा अपघात घडल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बहनागा रेल्वे स्थानिकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. ओडीशाचे मुख्य सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात तीन रेल्वेंचा समावेश आहे.
एनडीआरएफच्या चार तुकड्यासोबत ३० डॉक्टर, २०० पोलिस आणि ६० रुग्णवाहिका घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.
ओडीशा सरकारचे मंत्री अपघात स्थळी शुक्रवारी उशिरा दाखल झाले आहे. तसेच ओडीशा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केलइ आहे. तर गंभीर जखमींना २ लाखांची मदत केली जाणार आहे.