व्यवसायात जम बसला नाही, मग त्यांनी सुरु केली बनावट नोटांची छपाई
-आयटी डिप्लोमा केलेल्या तरुणांनी चीनमधून कागद मागवला अन् पुण्यात सुरु केली बनावट नोटांची छपाई
पुणे: पुणे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयटी डिप्लोमा झालेल्या तरुणांनी गुन्हेगारी सुरु केली. व्यवसायात जम बसला नाही, त्यामुळे त्यांनी बनावट नोटांचा कारखाना सुरु केला. आता पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणात सहा जणांना पुणे पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. ऑफसेट मशीनवर बनावट नोटा छापत होते. ही नोट हुबेहुब त्यांनी तयार केली. एकूण ७० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
काय झाला प्रकार
पुणे शहरातील सहा तरुणांनी व्यवसाय सुरु केला. त्यामध्ये एक जण आयटीमध्ये डिप्लोमा केलेला युवक आहे. या युवकांनी नवीन प्रिंटिंग प्रेस घेतले. त्यानंतर छापाईचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात मंदी आली. त्यांचा व्यवसाय चालू लागला नाही. त्यानंतर चीनमधून ऑनलाइन बनावट नोटा छापण्यासाठी कागद मागवला. त्या कागदावर 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. 70 हजारांच्या नोटाही त्यांनी छापल्या. त्या विकत असताना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि अवघ्या टोळीचा पर्दाफाश झाला.
सहा जणांना अटक
पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या लोकांनी आयटी डिप्लोमा केला होता. आरोपींकडून सत्तर हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्यात. या लोकांनी अजून नोटा चलनात आणल्या की नाही, त्याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत. या टोळीची पायमुळं आणखी किती खोलवर आहेत याचा तपास पोलीस करतायत.
या प्रकरणात या टोळीला कोणाची मदत झाली, त्यांनी हुबेहुब नोटा कशा तयार केल्या, यासंदर्भात तपास पोलिसांनी सुरु केली आहे.