मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार, विकासकामांना गती मिळणार; CM फडणवीसांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती.
.jpeg)
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने एक सामंजस्य करार केला आहे. इंडिया ग्लोबल फोरममध्ये काही महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. MMRDA च्या माध्यमातून जे विविध प्रकल्प हाती घेतली आहेत त्याच्या फंडिंग टायअपचे आज सामंजस्य करार करण्यात आले, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हटलं की, "MMRDA संबंधित सामंजस्य करारातून 4 लाख 7 हजार कोटी रुपयांचा निधी विविध प्रकल्पांकडून उपलब्ध झाले आहेत. राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून जी विकासकामे हाती घेतली आहेत, याला कुठेही निधीची कमतरता राहणार नाही." मेट्रो, पाणी, रस्ते, टनेल अशा विविध प्रकल्पांकरिता आता निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (MMR) मध्ये आपण 1.3 ट्रिलियन इकोनॉमी करत आहोत, त्यासाठी आजच्या सामंजस्य करारामुळे मदत होणार आहे", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.