मुंबईसाठी हा गेमचेंजर प्रकल्प, मुंबई- नवी मुंबई 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत
 
-18 हजार कोटींच्या प्रकल्पावर 400 कॅमेऱ्यांची वाहनांवर नजर, वेगमर्यादा ताशी 100 किमी, अत्याधुनिक यंत्रणा अन् बरेच काही...
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सागरी सेतूचे उद्घाटन करणार आहे. जगातील सर्वात मोठा सागरी सेतू हा आहे. सागरी सेतूवर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावणार आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबी हा दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे. शुक्रवारी लोकार्पण झाल्यानंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत या सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे ४०० कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत.
रोज धावणार ७० हजार वाहने
अटल सागरी सेतूवर दिवसाला ७० हजार वाहने धावतील, असा दावा केला जात आहे. २२ किलोमिटरचा हा सागरी सेतूमुळे रायगडात माणूस अर्धा तासांत मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईसाठी हा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. सागरी सेतू तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामुळे वाहन क्षमता अधिक असणार आहे. या प्रकल्पाच स्टिलचा अधिक वापर केला गेला आहे.
अटल सागरी सेतूचा टोल फक्त २५०
राज्याच्या मंत्रिमंडळाने सागरी सेतूचा टोल २५० रुपयांवर केला आहे. यामुळे ५००-७०० रुपयांची बचत होणार आहे. २२ किलोमीटर लांब असलेल्या हा सागरी सेतू १६.५ किलोमीटर पाण्यावर आहे. ५.५ किलोमीटर जमिनीवर आहे. मुंबई ते नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ, मुंबई-पुणे एक्सप्रेस, मुंबई गोवा महामार्गावर लवकर जात येणार आहे. हा सेतू १५ हजार कुशल कामगारांनी तयार केला आहे. समुद्रात येणाऱ्या लाटा आणि भूंकप यांचा विचार सेतू तयार करताना केला आहे. शंभर वर्षांपर्यंत या सागरी सेतू सुस्थितीत राहणार आहे.