मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्या दुपारी वाहतूक राहणार बंद, गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्या दुपारी वाहतूक राहणार बंद, गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक
नवी मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर 23 मे रोजी दुपारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गुरुवार, 23 मे रोजी दुपारी 12 ते दुपारी 1 वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.
गॅन्ट्री बसवताना सदर कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना ब्लॉकदरम्यान पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.
पर्यायी   मार्ग कोणते?
मुंबई-पुणे महामार्गावरुन पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना जुना मुंबई-पुणे मार्गावरुन जाता येतील.
पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना तसेच बसेसना खोपोली एक्झिट येथुन वळवून जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्गावरुन येतील.
पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या व जड-अवजड वाहनांना खालापूर टोल नाक्यांवरुन जुना पुणे - मुंबई   महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका यातून जाता येणार आहे.
पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या व जड-अवजड वाहनांना पनवेल मार्गे मुंबईच्या दिशेने पुढे जाता येणार आहे.
पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने शेडुंग फाटयावरुन सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करण्यात येतील