Truck Driver strike |ट्रक चालकांच्या संपाचा मुंबई APMC मार्केटवर काय परिणाम ? पाहूया या बातमी मध्ये
 
ट्रक चालकांच्या संपाचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर अजून तरी परिणाम झालेला नाही. भाजीपाला ,फळ ,धान्य ,मसाला व कांदा बटाटा   मार्केटमध्ये   पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे सध्या तरी एपीएमसी मार्केटला ट्रक चालकांच्या संपाचा फटका बसलेला नाही.भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज ५३० गाड्याची आवक असून भाज्यांचे दर स्थिर आहे . वाटाणा व गाजराच्या आवक कमी झाल्याने ५ ते १० रुपये किलोच्या दरात वाढ झाली आहे पाहूया आजच्या बाजार भाव
मुंबई APMC होलसेल भाजीपाला   मार्केटमध्ये सर्व भाजीपाल्याचें आजचे आवक आणि दर ०२/०१/२०२४
Mumbai Apmc vegetable market ratesToday: मुंबई APMC   होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ५२५ गाड्याची आवक असून ५१०   गाड्यांची जावक   झाली आहे. मार्केटमध्ये आज कोथिंबीर १० ते १५   रुपये,मिरची ५० ते ७५ रुपये कोबी 10-14 रु , टोमॅटो १५ ते २५ रुपये,काकडी २५ ते ३० रु, वांगी २५ ते ४५ रुपये प्रतिकिलो आहेत. भेंडी ३० ते ४५ रु, शिमला मिरची 26-32 रु , कारली ३० ते ४० रु , गाजर २५-३५ रु, कांदापात 10-16 रु, वाटणा ३५-४५ रुपये ,मेथी 14-22 रु फ्लॉवर १५ ते २० रु, गवार ३५-४५ रु व आले 70-90 रु ,फरसबी ४० ते ६० , भुईमूग शेंग   ७० ते ८० रुपये प्रतिकिलो विक्री केली जात आहे.
 
मुंबई APMC होलसेल मार्केटमध्ये कांदा, बटाटा,लसणाची आजचे आवक आणि दर ०२/०१/२०२४
Mumbai Apmc Onion Market rates Today: मुंबई APMC होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज सकाळी १० पर्यंत १२१ गाड्याची आवक झाली आहे . कांद्याच्या ७५ गाड्यांमधून जवळपास १४ हजार ६०० गोनी कांद्याची आवक झाली आहे. मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा दर २० ते ३० रुपये आहे, नवीन कांद्याचा दर १५ ते २८ रुपये आहे,तसेच गोलटा कांद्याचा दर १० ते १५ रुपये आहे. मार्केटमध्ये बटाट्याच्या ४२ गाड्यांमधून १९ हजार १००   गोनी बटाट्याची आवक झाली आहे. मार्केटमध्ये UPहून आलेल्या जुन्या बटाट्याचा दर १५   ते १८ रुपये आहे, मध्य प्रदेश मधून आलेल्या जुन्या बटाट्याचा दर १२ ते १८ रुपये आहे, तर महाराष्ट्रातील तलेगावहून आलेल्या बटाट्याचा दर १० ते १७ रुपये व पंजाबमधून आलेल्या बटाट्याचा दर १० ते १२ रुपये प्रतिकिलोने बिक्री झाली आहे. मार्केटमध्ये आज लसणाच्या ०४ गाड्यांमधून १२८९ गोणी लासणाची आवक झाली आहे. मार्केटमध्ये उटीहून आलेल्या लसणाचा दर १६०   ते २४० रुपये आहे. तर देशी लसणाचा दर १२० ते १९० रुपये व गुजरात व up हून आलेल्या लसणाचा दर १२० ते १५० रुपये आहे . तर परदेशी चायनाहून आलेल्या लसनाचा दर १७० ते १९०   रुपये प्रतिकिलो आहे.