Turmeric Production : हळद उत्पादनात भारत जगात पहिला-आश्विन नायक
 
सांगली : कोरोनानंतरच्या कालावधीत नैसर्गिक हळद (कुरकुमिन) उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सांगलीतील हळद उत्पादन, खरेदी, निर्यातीमध्ये व्यापारी, अडते यांची भूमिका महत्त्वाची आहे.युरोप, अमेरिकेतून सौंदर्य प्रसाधने, औषधनिर्मितीसाठी हळदीतून निघणाऱ्या कुरकुमिनला मोठी मागणी आहे. भविष्यात सेंद्रिय उत्पादनांना निर्यातीची संधी आणि अधिकची किंमत मिळेल, असे मत ‘एफआयएसएस’चे अध्यक्ष आश्विन के. नायक यांनी व्यक्त केले.सांगली येथे फेडरेशन ऑफ इंडियन स्पाइस स्टेकहोल्टरतर्फे (एफआयएसएस) उंझा (गुजरात) सांगलीतील हळद व्यापारी, अडते व्यापाऱ्यांसाठी परिसंवाद झाला. केंद्र सरकारने हळद बोर्डाची नुकतीच स्थापना केली आहे. ही संस्था केंद्र सरकार, व्यापारी व शेतकरी यांच्यात दुवा म्हणून काम करणार आहे.
या चर्चासत्रात पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे हजेरी लावली. सांगली कृषी विभागाचे सहकृषी संचालक मनोजकुमार वेताळ उपस्थित होते.अध्यक्ष नायक म्हणाले, की कोरोनानंतर देशातील हळद उत्पादनाला मोठे महत्त्व आले आहे. १०० किलो हळदीपासून ३ ते ४ किलो कुरकुमिन निघते. त्याचा सौंदर्य प्रसाधनांसाठी वापर केला जातो.
त्यामुळे देशात आणि सांगलीतील हळद व्यापारी, अडते उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत या चर्चासत्रातून प्रश्न समजावून घेत आहोत. यातून निघणारे मुद्दे आम्ही केंद्र सरकारपुढे ठेवून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
‘एफआयएसएस’चे आश्विन नायक म्हणाले...
- सेंद्रिय उत्पादनांना जादा किमतीने निर्यातीची संधी.
- संस्थेतर्फे शेतकऱ्यांचीही जागृती करणार.
- सांगलीत लवकरच सर्वेक्षण करणार.
- शेतकरी गटांना निर्यातीची संधी.
- देशातून १७ हजार कोटींची निर्यात.