दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर आयोगाची माणसं आली ” उद्धव ठाकरेंचा भाजप व आयोगावर स्फोटक हल्ला!
दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर आयोगाची माणसं आली…” उद्धव ठाकरेंचा भाजप व आयोगावर स्फोटक हल्ला!
-मतदार याद्यांतील गोंधळावर उद्धव ठाकरेंचा इशारा — “या ठिणगीचा वणवा कधीही होऊ शकतो!”
-“आता हा अॅनाकोंडा कोंडवाच लागेल!” शोले डायलॉगमधून उद्धव ठाकरेंची भाजपवर तिखट फटकारणी!
-उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने बनावट अर्ज निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरेंचा थेट हल्ला!
-मतं चोरीविरोधात महाविकास आघाडी व मनसेची ‘सत्याचा मोर्चा’ मोहीम ठाकरे-राज दोघेही एकाच व्यासपीठावर!
मुंबई : विधानसभा निवडणुकांतील मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदारांविरोधात महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ‘सत्याचा मोर्चा’ उभारला. शनिवारी (1 नोव्हेंबर) मुंबईत झालेल्या या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी मी मातोश्रीवर बसलो होतो. मला सांगितलं की, निवडणूक आयोगाची माणसं आली आहेत. सर्व मराठी माणसं होती, त्यांचा दोष नाही. पण आता निवडणुकीच्या तोंडावर हे का आले? कुणी तरी त्यांना बोलावलं असणार.” अशा शब्दांत ठाकरे यांनी आयोगावर थेट निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले, “मतं चोरी करणाऱ्यांनी लक्षात ठेवा, आज फक्त ठिणगी दिसतेय पण या ठिणगीचा वणवा कधीही होऊ शकतो. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीत आहे.”
‘शोले’ चित्रपटातील संवादाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आज लोकांना सांगतोय — जागे राहा, नाहीतर अॅनाकोंडा येईल. या अॅनाकोंडाला आता कोंडवावंच लागेल, नाहीतर हे सुधारणार नाहीत.”
मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देताना ठाकरे म्हणाले, “तुम्ही म्हणता आम्ही काहीतरी केलं, मग आमचा पर्दाफाश करा. दूध का दूध, पाणी का पाणी एकदाच होऊ द्या.”
यावेळी त्यांनी एक गंभीर उघड केली. “एका अर्जदाराचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं दाखवलं गेलं आहे. मी स्वतः अर्ज केलेलाच नाही. खोटा मोबाईल नंबर, बनावट पडताळणी… म्हणजे माझ्याही नावाने फसवणूक!” असं सांगून ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
उद्धव ठाकरे यांच्या या भाषणाने सभास्थळी उपस्थित जनसमुदायात प्रचंड उत्साह आणि संतापाची लाट उसळली.