Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

 
Weather Update Pune राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहेत. उद्यापासून (ता. ७) राज्याच्या बहुतांश भागात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता आहे.आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धाराशिव, नांदेड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला असून, शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे.
तामिळनाडू किनारपट्टी आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच उत्तर कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३४.३ (२१.२), जळगाव ३६.० (२२.६), कोल्हापूर ३४.३ (२२.०), महाबळेश्वर २८.० (१५.६), नाशिक ३३.५(२१.०),
निफाड ३६.१ (२१.७), सांगली ३५.८ (२२.१), सातारा ३५.४ (२०.९), सोलापूर ३७.६ (२२.७), सांताक्रूझ ३२.४ (२६.०), डहाणू ३२.५ (२५.०), रत्नागिरी ३३.६ (२४.७),
छत्रपती संभाजीनगर ३१.० (२१.०), नांदेड ३२.४ (२१.२), धाराशिव ३५.६ (२०.८), परभणी ३४.५ (२१.७), अकोला ३३.८ (२२.९), अमरावती ३२.०(२०.३), बुलढाणा ३२.० (२२.२), ब्रह्मपूरी ३५.० (२२.८),
गडचिरोली ३४.२(२२.०), गोंदिया ३४.४ (२२.०), नागपूर ३२.८ (२१.१), वर्धा ३३.५(२२.६), वाशीम ३१.८ (२२.२), यवतमाळ ३३.० (२१.५).