पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर 1, जगात भारताचा डंका; मोदी यांच्या नावाने रेटिंगचा नवा रेकॉर्ड
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसुधैव कुटुंबकम अशा जागतिक नीतीचा वापर केला. कोरोनाकाळात प्रत्येक देश लसीकरणासाठी प्रयत्न करत होते. अशात मोदी यांनी ज्यांना लसीची गरज आहे, अशा देशांना मदत केली. त्यामुळे मोदी यांच्याकडे पाहण्याचा जगात दृष्टिकोण बदलला. अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जीना रायमोंडो १० मार्च २०२३ रोजी नवी दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोदी यांची स्तुती केली. डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मोदी यांच्यामुळे मिळाली असल्याचं त्या म्हणाल्या. अमेरिकेत परतल्यानंतरही रायमोंडो यांनी मोदी हे जगातील लोकप्रीय नेता असल्याचं म्हटलं.
पाच ट्रीलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार
भारताला पाच ट्रीलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. विरोधक टीका करत असले तरी जागतिक बँक, जगातील उद्योगपती, अर्थशास्त्रज्ञ ही वास्तविकता असल्याचं बोलत आहेत. जगातील संकटाला बाहेर काढण्याचे सामर्थ्ये भारतात आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे उद्योगपती रेमंड डॅलिओ म्हणाले, भारताचा विकासदर सर्वात जास्त आहे. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भारताची चमकदार कामगिरी
आयएमएफचे एमडी क्रिस्टलीना जॉर्जिएवा यांनी म्हटलं की, भारत हा सर्वात चांगली चमकदार कामगिरी करणारा देश आहे. कोरोनानंतरही भारत सर्वात वेगाने आर्थिक विकास साधत आहे. बिल गेट्स यांच्यासारखे उद्योगपती यांनी दावा केला की, भारत पाच ट्रीलीयन नाही तर दहा ट्रीलीयन डॉलरची अर्थव्यवस्थेचा देश होण्याच्या मार्गावर आहे.
भारताची अर्थव्यवस्था ७५ ट्रीलीयन डॉलर होणार
ऊर्जा कंपनी नायरा एनर्जीचे सीईओ यांचा दावा आहे की, मोदी सरकारने आर्थिक विकासाचा मॉडेल बनवला आहे. त्यामुळे येत्या २५ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ७५ ट्रीलीयन डॉलरची होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीची जगात चर्चा होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये लंडनमध्ये होते. तेव्हा ब्रिटीश पंतप्रधान डेवीड कॅमरूल म्हणाले होते की, भारतात चांगले दिवस येणार आहेत. आता आठ वर्षांनंतर पूर्ण जग मोदींच्या बाबतीत असाच विचार करताना दिसून येत आहे.
९ वर्षांपासून पहिल्या क्रमांकाचे नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल रेटिंगमध्ये ७६ टक्के मान्यता घेऊन पुन्हा जगात नंबर वनचे नेते ठरले आहेत. अमेरिकेच्या एजंसीने हा सर्वे केला आहे. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयार्क टाईम्स, वॉल स्ट्रीट जर्नलसारख्या वर्तमानपत्रांनी याची दखल घेतली आहे. नेत्यांच्या जागतिक क्रमवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या ९ वर्षांपासून पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. हासुद्धा एक रेकॉर्ड आहे. जगातील मोठे नेतेसुद्धा मोदी यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवतात.
स्वामी विवेकानंद यांचं स्वप्न होतं की, भारतमाता विश्वगुरू झाली पाहिजे. भारतमातेने जगाचे नेतृत्व केले पाहिजे. जगाच्या अपेक्षा भारतमाता पूर्ण करणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं.