बिहार मधून आलेले 63 अल्पवयीन मुस्लिम मुले पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूर:राज्यात मन सुन्न करणाऱ्या बातम्या घडत च असतात. तशीच एक घटना कोल्हापूर मध्ये घडलीये. 
६३ अल्पवयीन मुस्लिम मुलांना घेऊन जाणारा एक ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पकडला आहे. ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशात शिक्षणासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रकमध्ये 7 ते 14 वयोगटातील 63 मुलं होती. ही सर्व मुलं कोल्हापुरात रेल्वेने दाखल झाली, त्यानंतर एका ट्रकमधून आजाऱ्याला जाणार होती. मुलांचा हा ट्रक पाहून भाजपाचे प्रदेश सदस्य विजयद्र माने यांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांना संपर्क साधला आणि ही मुले असलेला ट्रक शाहुपुरी पोलिस ठाण्यात आणला. तसेच मालवाहतूक ट्रकमधून अल्पवयीन मुलांची विनापरवाना वाहतूक केल्या बद्दल प्रादेशिक परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या ६३ मुलांनी नक्की कुठे घेऊन जाणार होते असे अनेक प्रश्न पडत आहेत   हा नेमका काय प्रकार आहे याबाबत पोलीस कसून तपास करतायत.