Apple Farming Success Story | जालन्यात फुलवली सफरचंदाची बाग, अर्ध्या एकरात लाखांचं उत्पन्न
पारंपरिक शेतीतून पदरी पडणारी निराशा पाहता आता आपला बळीराजा नव्या प्रयोगांच्या शोधात दिसतो आहे...हा शेतकरी पाहा चक्क जालन्याचं बनवतोय... अहो म्हणजे चक्क जालन्यात कश्मीरची सफरचंद पिकवत हा शेतकरी लाखो कमावतोय...पाहुयात जालन्याच्या प्रयोगशील बळीराजाची ही यशोगाथा....हे आहेत जालन्याचे कैलास जिगे...या सफरचंद लागवडीसाठी शेतकरी जिगे यांनाजिगेंनी गेल्या २ वर्षांत ४० हजारांचा खर्च केला...पण आता ह्याचा मोबदलाही तगडा मिळेल याची त्यांना खात्रीय. संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने केलेल्या या शेतीत फवारणीचीही आवश्यकता नाही, या शेतीत कोणतीही अडचण येत नसल्यानं शेतकऱ्याच्या जीवाला घोर लागत नसल्याचं जिगे सांगतात....मेहनत अन् चौकटीबाहेर पटण्याच्या तीव्र इच्छेनं कैलास जिगेंची जालन्याचं कश्मीर बनवण्याचं स्वप्न पूर्ण झालंय....कित्येक नव्या दमाच्या शेतकऱ्यांसाठी जिगेंचा हा प्रवास निश्चितच मार्गदर्शक अन् प्रेरणादायी ठरेल.