अलिबाग APMCच्या निवडणुकीत शिंदे गटाचे राजा केणी, शैलेश पाटील यांचा अर्ज वैध; शेकापचा डाव फसला
 
जिल्हा उपनिबंधक रायगड यांचा महत्त्वपूर्ण निर्णय  
Alibag Apmc   Election Update : सध्या शेतकऱ्यांची दशा अन् दिशा खूप वाईट आहे. मार्केट कमिटीत पुरेशा सुविधा नाहीत. शेतकऱ्यांच्या हिताची व कल्याणाची निवडणूक असून, शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही विचारांची लढाई आहे.कोणत्याही परिस्थितीत निवडणूक होणार म्हणजे होणारच, यात माघार नाही, असे म्हणत रायगड   शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यामुळे शेतकरी कामगार पक्ष्याच्या   अडचणी वाढल्या आहेत.
शेतकऱ्यांची सेवा हाच खरा धर्म पाळून बाजार समितीत कार्य करणे गरजेचे आहे. तालुक्यात सर्व बाजार समितीच्या ५० वर्षांपासून विकट   परिस्थिती झाली आहे बाजार समितीच्या स्वतःचा मार्केट यार्ड आणि   स्वतःच्या कार्यालय नसल्याने शेतकरी ,वयापारी अडचणीत आहेत . शेतकरी कामगार पक्ष्याने हि शेतकऱ्यांना हद्दपार करून टाकली आहे त्यामुळे   येणाऱ्या २८ एप्रिल रोजी मतदारांनी भूलथापांना बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन राजा केणी यांनी केला आहे .
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये   राजा केणी आणि   शैलेंद्र राम पाटील यांनी भरलेला निवडणुकीसाठीचा अर्ज समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने जाणूनबुजून अवैध ठरवण्यात आला होता. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर दाद मागण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात   राजा केणी व   शैलेंद्र राम पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील केले होते.   न्यायालयात सदर प्रकरणाचा निकाल राजा केणी यांच्या बाजूने लागला असून   जिल्हा उपनिबंधक यांनी हा अर्ज संपूर्णपणे कायदेशीररित्या वैध ठरवला आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे   शैलेंद्र राम पाटील यांचा सुद्धा अर्ज कायदेशीररित्या पूर्णतः वैध ठरवला असून या निमित्ताने पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे गलिच्छ राजकारण चव्हाट्यावर आले आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने शिंदे गटाचे वकील अॅड.   सुशील पाटील व अॅड. मनोज पाटील यांनी   राजा केणी आणि   शैलेंद्र पाटील, माजी सरपंच, आंबेपूर ग्रामपंचायत यांची बाजू न्यायालयासमोर सक्षमपणे मांडली. न्यायालयाचा हा निर्णय अलिबाग तालुक्यात शेतकरी कामगार पक्षासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तसेच शिवसेना पक्षासाठी हा निर्णय म्हणजे तालुक्यात विजयासाठी आणखीन एक यशस्वी पाऊल ठरले असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे भविष्यात खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील शेतकऱ्याला न्याय मिळेल, अशी जोरदार चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
तब्बल ५० वर्षपासून   अलिबाग तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकहाती सत्ता होता आता शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाने निवडणूकीत उडी मारल्याने   तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यातील बळीराजांच्या हक्काची अन् कष्टाची समजली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली अनेक दशके शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करून   गोरगरीब सामान्य शेतकऱ्याची केवळ लुबाडणूकच चालवली होती. आपल्याच पक्षातील मर्जीतील लोकांना आणि कर्मचाऱ्यांना समितीच्या विविध पदांवर बसवून शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले लाखो रुपये लुटण्याऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा   शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी या भ्रष्टाचाराचा जनतेसमोर भांडाफोड करून खरपूस समाचार घेतला होता. या प्रकरणाने शेकापच्या   पायाखाली   वाळू सरकली होती. हे प्रकरण आपल्याच अंगावर शेकत आहे असे वाटत असताना   सारवासारव करण्यात आली होती. परंतु कोणत्याही दाव्याला न जुमानता शिवसेना पक्षाच्या बाजूने खंबीर बाजू मांडून राजा केणी यांनी सत्य बाजू जनतेसमोर आणली .