Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे समन्स, अडचणी वाढणार?
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात आता सीबीआय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना चौकशीचे समन्स बजावले आहेत. केजरीवाल यांना येत्या 16 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची माहिती आपचे नेते खासदार संजय सिंह पत्रकार परिषद घेऊन संध्याकाळी सहा वाजता सविस्तर माहिती देणार असल्याची माहिती मिळत आहे.