भाजीपाला मार्केटचे सहायक सचिव मारुती पबितवार यांची धान्य मार्केटच्या प्रभारी उप सचिव पदावर नियुक्ती
 
भाजीपाला   मार्केटचे सहायक   सचिव मारुती पबितवार यांची धान्य मार्केटच्या   प्रभारी उप सचिव पदावर नियुक्ती
धान्य मार्केटवर उप सचिव मारुती पबितवार यांची नेमणूक
सचिव राजेश भुसारी यांच्या आदेशानुसार पार पडली नेमणूक
उप सचिव मारुती पबितवार यांना सेस वसुलीचे मोठे आव्हान
 
नवी मुंबई: मुंबई Apmc धान्य मार्केट उप सचिव N.D जाधव ३० एप्रिल रोजी सेवानिबृत झाले ,सेवा निबृत होऊन ८ दिवस झाले असून आतापर्यंत उप सचिव पदासाठी कांडा बटाटा , भाजीपाला व फळ मार्केट मध्ये रसशीखेच सुरु होती. पण आजच धान्य मार्केट उप सचिव पदासाठी भाजीपाला मार्केट सहायक सचिव मारुती पबितवार याना धान्य मार्केटच्या प्रभारी उप सचिव पदावर   नेमणूक करण्यात आली आहे .सचिव राजेश भुसारी यांनी हे आदेश काढले आहे. मुंबई एपीएमसी सचिव राजेश भुसारी यांनी   सर्व मार्केटच्या उप सचिवांना वसुलीसाठी टार्गेट दिले होते त्याधारे वर्ष २०२२-२३ ला धान्य मार्केटला   २० कोटी ५० लाख रुपये टार्गेट देण्यात आला होता .तत्कालीन उप सचिव N.D जाधव यांनी   २३ कोटी १५ लाख ५१ हजार विक्रमी वसुली केला .देण्यात आलेल्या टार्गेट पेक्ष्या जास्त सेस वसुली केली त्यामुळे आजच उप सचिव पदावर रुजू झालेले मारुती पबितवार याना सेस वसुली मोठा आव्हान आहे