"बत्ती गुल मीटर चालू " एका महिन्याच बिल लाखांवर

राज्यात वीज महावितरण कडून अनेकदा वीज बिलात चूक होत असल्याची ग्राहकांकडून तक्रारी येत असते . अशीच घटना मनमाड मध्ये इकबाल शेख यांच्या बाबतीत घडलीये चक्क एक महिन्याचं बिल हे ४ लाख 5 हजार 490 रुपयाचे बील आले आहे त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तक्रार केली असता अधिकाऱ्यांकडून त्यांचं बिल २ लाख 13 हजार 360 रुपयाचे बील करण्यात आलं. इकबाल शेख यांचं बांगड्या विकण्याचं छोटंसं दुकान असून त्यांच्या घरात फक्त 3 लाईट, दोन पंखे अन् १ फ्रिज आहेत. तरीही इतकं बिल कास येऊ शकत ? हा प्रश उपस्तित राहिलाय हे बिल भरण्यास शेख यांनी नकार दिल्यावर महावितरण ने वीज पुरवठा बंद केला. शेख यांच्या कुटुंबावर अंधारात राहण्याची वेळ आलीये असे प्रकार अनेकदा होत असतात महावितरण कडून होणाऱ्या चुकांचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतोय. या वर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.