BIG BREAKING | 16 आमदारांबाबतचा कोर्टाचा निकाल सर्वसामांन्यांना लाईव्ह पाहता येणार, जाणून घ्या कसं आणि कुठे पाहायचं?
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा निकाल असेल. त्यामुळे जनतेला कोर्टाचा निकाल थेट कोर्टातून पाहता येणार आहे. कोर्टाचा निकाल थेट टीव्हीवरुन पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. कोर्टात नेमकं काय सुरु आहे, न्यायाधीश निकाल कसं वाचणार हे जसंच्या तसं जनतेला टीव्हीवर पाहता येणार आहे.
हा निकाल ऐतिहासिक असल्याने जनतेला थेट कोर्टात सुरु असलेलं निकालाचं वाचन जसंच्या तसं पाहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची ही पहिली अशी केस असेल की जनतेला कोर्टाचं निकाल वाचन थेट टीव्हीवर पाहता येणार आहे.
ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ही स्वागतार्ह भूमिका असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा विषय हा जनतेचा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय भाष्य करत हे जनतेला कळायला हवं अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय घेतला असेल, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.