कापूस शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर
राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव आठ हजार त्याहून अधिक पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांशी बाजार समितीत स्थिर आहेत.पांढरं सोनं म्हटल्या जाणाऱ्या कापसाला पुन्हा सोन्याचा भाव आला आहे, मागील काही महिने कापसाचे भाव कोसळले होते, पण कापसाच्या बाबतीत शेतकऱ्यांसाठी आता संधी आणि खुशखबर आहे.
बाजारात कापसाठी आवक मंदावली आहे, मात्र कापसावर दबाव वाढत आहे, म्हणजेच कापसाची मागणी आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे कापसाची सर्वात जास्त आवक झाली आहे.आज सर्वाधिक कापूस आवक उमरेड बाजारात १ हजार १३० क्विंटल झाली. तर सर्वाधिक दर वर्धा बाजारात ८ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला.
उष्णता तडाखा वाढून वजन घटण्याआधी कापूस विकलेला योग्य
मे महिन्यात अनेक कापसाच्या जीन या हवा आणि आगीच्या घटना घडू नये म्हणून बंद होतात, कापसाचा सिझन संपायला येतो. म्हणून त्या आधीच काही शेतकरी कापूस देऊन ठाकतात. तशीच भूमिका परवडणारी ठरते कारण कापूस घरात ठेवून दिवसेंदिवस उष्णता वाढली तर कापसाचे वजनदेखील कमी होते, घरात ओल लागली, किंवा अवकाळी पावसामुळेही कापूस खराब होण्याची भीती असते. म्हणून कापूस विकून हातात पैसे आल्यावर इतर शेतीच्या कामाकडे मोर्चा वळवण्याचा निर्धार शेतकरी करु लागला आहे.