तुमच्यासारख्या देशातील 67 कोटी लोकांचा डेटा चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात
हैदराबाद : भारतातील सर्वात मोठा डेटा चोर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. तुमच्या, आमच्यासारख्या तब्बल देशातील 67 कोटी लोकांचा डेटा या ठगाने चोरला होता. देशातील 24 राज्ये आणि आठ महानगरांमधील 66.9 कोटी व्यक्ती आणि संस्थांचा वैयक्तिक आणि गोपनीय डेटाची त्याने चोरी केली आहे. डाटा चोरी करणे आणि विकल्याच्या आरोपाखाली अटक त्याला करण्यात आली आहे.आरोपी हरियाणातील फरिदाबाद येथील ‘InspireWebz’ नावाच्या वेबसाइटवर काम करत होता.
कोण आहे सर्वात मोठा चोर
देशातील सर्वात मोठा डेटा चोरीचा आरोपी विनय भारद्वाज आहे. त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. विनय भारद्वाजकडे बायदूज, वेदांतू, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, पेटीएम आणि फोन पे यासह अनेक मोठ्या कंपन्यांचा डेटा आहे. एकामागून एक ट्विट करत पोलिसांनी डेटा चोरी प्रकरणाचा खुलासा केला. पोलिसांनी सांगितले की, विनय भारद्वाज हा ग्राहकांना डेटाबेस विकत होता. त्याचे नेटवर्क 24 राज्ये आणि 8 महानगरांमध्ये पसरले होते. एकूण 66.9 कोटी व्यक्ती आणि संस्थांच्या वैयक्तिक आणि गोपनीय डेटाची चोरी त्याने केली होती.
अनेक कंपन्यांचा डेटा
आरोपींकडे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचा डेटा होता. त्याच्याकडे GST, विविध राज्यांतील रस्ते वाहतूक संघटना, आघाडीची इको-कॉमर्स पोर्टल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि फिनटेक कंपन्यांसारख्या प्रमुख संस्थांचा डेटा होता. तो 66.9 कोटी व्यक्ती आणि संस्थांच्या वैयक्तिक आणि गोपनीय डेटाची विक्री करताना सापडला. आरोपींकडे सरकारी, खाजगी संस्था आणि व्यक्तींची संवेदनशील माहिती आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, दोन लॅपटॉप आणि डेटा जप्त केला आहे. तो ‘इंस्पायरवेब्ज’ या वेबसाईटमध्ये काम करत होता.
यांचीही माहिती
आरोपीकडे संरक्षण दलातील कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पॅन कार्ड धारक, नववी, दहावी, अकरावी, बारावीतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा डेटा होता. तसेच डि मॅटे खातेधारक, नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी, श्रीमंत व्यक्ती, विमा पॉलीसीधारक, क्रेडीट अन् डेबिट कार्ड वापर करणाऱ्या लोकांचा डेटा त्यांच्याकडे होता.