Drugs Bans : पॅरासिटामॉल कॉम्बिनेशनसह 14 औषधांवर बंदी, ही आहे संपूर्ण यादी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या 14 औषधांवर लगाम कसला आहे. 14 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (FDCs) ड्रग्सवर बंदी घातली आहे. निमेसुलाइड (Nimesulide) आणि पॅरासिटामॉल (Paracetamol) डिसपर्सिबल टॅबलेट्स, क्लोफेनिरेमाईन मेलिएट (Chlopheniramine Maleate) आणि कोडीन सिरप (Codeine Syrup) यांचा या यादीत समावेश आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या औषधांचा वापर मानवी शरीरासाठी हानीकारक आहे. त्यामुळे या औषधांचे उत्पादन, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने याविषयीची अधिसूचना काढली आहे.
कशासाठी होतो वापर
केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने याविषयीची शिफारस केली होती. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ताप, डोकेदुखी, अर्धशिशी, अंगदुखी, दातांचे दुखणे, संधिवात वेदना, स्पॉन्डिलायटिस, ऑस्टियोआर्थरायटिस, पीरियड वेदना इत्यादींमध्ये नायमसुलाइड आणि पॅरासिटामॉलचे संयुक्त औषध घेतले जाते. या औषधांच्या अनियंत्रित वापराचा परिणाम यकृत, मूत्रपिंड आणि हृदयावर होण्याची दाट शक्यता आहे.
ही आहे औषधांची यादी
Nimesulide + Paracetamol डिसपर्सिबल टॅबलेट्स, Chlopheniramine Maleate + Codeine Syrup, Pholcodine +Promethazine, Amoxicillin + Bromhexine and Bromhexine + Dextromethorphan + Ammonium Chloride + Menthol, Paracetamol + Bromhexine+ Phenylephrine + Chlorpheniramine + Guaiphenesin आणि Salbutamol + Bromhexine या औषधांचा या यादीत समावेश आहे