Farmer: हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांद्याच्या ढिगाचा चिखल
हिंगोली: शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकटं येत असल्याने शेतकरी   आता आर्थिक संकटात सापडला असल्याने शेतीवर केलेला खर्चही बाहेर निघत नाही अशी व्यथा कांदा उत्पादक शेतकरी बोलून दाखवत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड   केली होती. अवकाळी आणि बदलत्या वातावरणातून शेतकऱ्यांनी उत्कृष्ट दर्जाचा कांदा पिकवला. मात्र एप्रिलमध्ये काढलेल्या कांद्याला भावच नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतातचं ढीग मारला आहे. आज भाव लागेल उद्या भाव अशी अशा शेतकरी करत होते. मात्र कांदा तीन रुपये किलोच्यावर जात नसल्याने भाव वाढीच्या आशेत असलेल्या शेतकऱ्याचा तीन एकर मधील शकडो टन कांद्याच्या जाग्यावरचं चिखल झाला आहे.
आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने चिखल झालेला कांदा शेतीच्या बाहेर नेऊन टाकावा लागत आहे. झालेला खर्च आणि बाहेर नेऊन टाकण्याचा खर्च असा दुहेरी भुर्दंड कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. उन्हाळा कांद्यातून काहीतरी मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादकांनी घेतलेले उन्हाळा कांद्याचे पीक भाव नसल्याने जाग्यावरचं सडून गेल्याने कांद्याला लाख रुपये खर्च केल्याने आता पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यां समोर पडला आहे. उन्हाळी कांद्यातून आलेल्या पैशातून खरिपाची पेरणी करायची होती, मात्र भाव नसल्याने हात तोंडाशी आलेला घास हिरवल्याने आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली जिल्हा बँकेकडून सुरू आहे. याचा निषेध म्हणून शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड येथे घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना ज्या कर्जाच्या नोटिसा दिल्या आहेत, त्या रामकुंडाच्या पाण्यात बुडवून निषेध करण्यात आला. जिल्हा बँकेची ही सक्तीची वसुली तात्काळ थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सरकारने जबाबदारी स्वीकारून आम्हाला कर्जमुक्त करावे, अशी देखील मागणी करण्यात आली. जोपर्यंत जिल्हा बँकेची सक्तीची वसुली थांबत नाही, सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत नाही, तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.