मावळ भागातील शेतकऱ्यांनी केली भात पेरणी सुरु
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस अती प्रमाणात असलेल्या ठिकाणी भाताचं पीक घेतलं जात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक असल्यामुळे लोकांनी पावसाची वाट न पाहता पेरणीला सुरवात केली आहे. पुण्याच्या भोर   तालुक्यातील हिर्डस मावळ खोऱ्यातील शेतकऱ्यांची धूळ वाफेवर भात पेरणीची लगबग सुरु झाली आहे. जून महिना सुरु होऊन आठ दिवस झाले आहेत. पावसाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भात पेरणीला सुरवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मे महिन्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला होता. तरी सुध्दा शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सगळ्या मशागती केल्या आहेत. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बी हंगाम पुर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी मोठा निराश झाला होता. मावळ मधील शेतकरी वर्ग पारंपारिक पद्धतीने शेती करीत आहे. काही ठिकाणी बैलांच्या साहाय्याने कुळवणी आणि नांगरणी झाली आहे.पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डस मावळ खोऱ्यातील शेतकऱ्यांची धूळ वाफेवर भात पेरणी सुरु झाली आहे. जून महिना सुरू झाल्यानं पावसाची वाट न पाहता या भागातील शेतकऱ्यांनी, पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भात पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात शेतात शेतकरी राबताना दिसला आहे. त्याचबरोबर औताच्या साहाय्याने कुळवणी करून पारंपरिक पद्धतीने याठिकाणी भात पेरणी केली जात आहे. भात हे मावळ तालुक्यातलं प्रमुख पीक आहे. त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या पिकावर अवलंबून असतो.