शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड,नऊ हजारांचा टप्पा गाठणार?
मागील काही दिवसात तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र दिसून येत होतं. परंतु   आता अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या भावात तेजी आली.अनेक भागांमधील तूर काढणी आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र बाजारातील तूर आवक वाढली नाही. उत्पादन घटल्यानं शेतकरी चांगल्या दराची वाट पाहत आहेत.तुरीचे भाव ४०५ रुपयांनी प्रति क्विंटल मागे वाढले आहेत. 
अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामात तुरीची चांगली पेरणी करण्यात आली. मागील महिन्यात तुरीचे भाव स्थिर होते. परंतु, मार्च महिन्यात सुरुवातीला तुरीच्या भावात काहिशी घसरण पाहायला मिळाली. आता पुन्हा तुरीच्या भावात तेजी येत आहे. 
तुरीच्या कमाल दरात ९० तर किमान दरात ८०० रुपयांची वाढ झाली. आज शनिवारी १०५ रुपयांनी तुरीचे भाव वाढले आहेत. कमीत कमी ६ हजार पाचशे ते ८ हजार ४०० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव मिळाला होता. परंतु मागील काही दिवसांत तुरीची आवक चांगली झाली, पण गेल्या दोन-तीन दिवसात तुरीची आवक मंदावली आहे. काल अकोल्याच्या बाजारात ६६२ क्विंटल इतकी दूर खरेदी झाली होती तर आज ७२३ क्विंटल तूरीची आवक झाली आहे.