युवकांसाठी खुशखबरी, नोकर भरतीसाठी पीएम मोदी मिशन मोडवर, २०२३ मध्ये मिळणार इतक्या सरकारी नोकऱ्या
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी विविध सरकारी विभागात सहभागी होणाऱ्या ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित करतील. तसेच त्यांना व्हर्च्युअली संबोधित करतील. रोजगार मेळावा (employment fair) देशातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांसह राज्य सरकार आणि केंद्रात भरती केली जात आहे. देशभरातील ही भरती ग्रामीण पोस्टमॅन, इनिस्पेक्टर, टिकीट क्लर्क, ज्युनिअर क्लर्स आणि टायपीस्ट, ट्रॅक मेंटनर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, लोवर डिवीजन सारख्या विविध पदांसाठी भरती होईल. लिपीक, अधिकारी, कर सहायक आदी सहभागी होतील.
युवकांचे सशक्तीकरण होईल
रोजगार मेळावा रोजगारासाठी सर्वोच्च प्राथमिकता देईल. पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे युवकांचे सशक्तीकरण होईल. तसेच राष्ट्राच्या विकासासाठी चांगली संधी मिळेल.
नवीन भरतीसाठी युवकांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल. सर्व सरकारी विभागाच्या नवीन नियुक्त केलेल्यांसाठी ऑनलाईन ओरिएंटेशन कोर्स आहे.
स्वतःला प्रशिक्षित करण्याची एक संधी
रोजगार मेळावा हा पंतप्रधानांचे स्वप्न साकार करणारी एक चांगली संधी आहे.नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कर्मयोगी प्रारंभच्या माध्यमातून स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल. नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी एक ऑनलाईन कोर्स शिकावा लागणार आहे.
वर्षाच्या शेवटपर्यंत १० लाख नोकरभरती
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी २२ ऑक्टोबरला रोजगार मेळाव्याला सुरुवात केली. विविध सरकारी एजंसींसोबत एसएससी, युपीएससी, रेल्वे इत्यादीमध्ये भरती पूर्ण करण्यात येत आहे. २०२३ पर्यंत सुमारे १० लाख भरती केली जाईल. पीएम मोदी यांनी असे निर्देश दिले की, सरकार २०२३ पर्यंत सुमारे दहा लाख जागांची भरती करेल.
देशात विविध ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे नोकरभरती होईल. युवकांना रोजगार मिळेल. त्यांना नवीन शिकण्याची संधी मिळेल. ही युवकांसाठी चांगली संधी आहे.