“तुझ्यात इंटरेस्ट संपलाय, आता मला तुझी….’, विवाहित महिलेबरोबर घडलं ते धक्कादायक
गुजरात: बिझनेस, वासना, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूरतच्या दिंडोलीमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेबरोबर जे घडलं, ते खूपच भयानक आहे. पीडित महिलेने आरोपी ईश्वर पटेल उर्फ विक्रम राणा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. आरोपी सुद्धा त्याचा भागात राहतो. आरोपीने मला घरी बोलवून, माझ्यावर जबरदस्ती केली, अत्याचार केला. त्यानंतर त्याने ब्लॅकमेलिंग सुरु केलं.
त्याने माझ्याकडून 25 लाख रुपये उकळले. पैशांसाठी त्याने माझ्या नवऱ्याला आणि मुलीला संपवण्याची धमकी दिली, अस पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपी काय धमकी देत होता?
सांगितलेलं ऐकलं नाही, तर अत्याचाराबद्दल सर्वांना सांगेन, अशी धमकी आरोपीने दिली होती. दिंडोली पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376, 384 आणि 506 अतंर्गत गुन्हा नोंदवला. रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
पटेल त्या महिलेच्या घरी जायचा
एफआयआरनुसार, पीडितेची आरोपी ईश्वर पटेल बरोबर 8 वर्षांपूर्वी एका जिममध्ये ओळख झाली होती. पटेल त्याच्या आईबरोबर जीममध्ये यायचा. पटेलच्या आईची पीडित महिलेबरोबर चांगली ओळख झाली. आई सोबत पटेल त्या महिलेच्या घरी जायचा. ओळख वाढल्यानंतर ईश्वर पटेलने घराचे हप्ते भरण्यासाठी महिलेकडे काही पैसे मागितले. महिलेने त्याला पैसे दिले.
पार्ट्नरशिपमध्ये बिझनेसचा प्रस्ताव
ईश्वर पटेलने त्यानंतर पीडित महिलेला पार्ट्नरशिपमध्ये बिझनेसचा प्रस्ताव दिला. त्याने पीडित महिलेची निर्मला आणि हर्षवर्धन या दोघांशी तिची ओळख करुन दिली. ते दोघे पर्सनल लोनची व्यवस्था करु शकतात, असं सांगितलं. दोघांनी महिलेकडून डॉक्युमेंट घेतल्यानंतर तिला फसवलं. त्यानंतर तिने पटेलला फोन केला.
किती लाख उकळले?
ईश्वर पटेलने या विषयावर बोलण्यासाठी म्हणून पीडित महिलेला त्याच्या घरी बोलावलं. महिला त्याच्या घरी गेली, त्यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराची माहिती सार्वजनिक करण्याची तो धमकी देऊ लागला. पैशांची मागणी पूर्ण केली नाही, तर पीडितेला, तिच्या नवऱ्याला आणि मुलीला संपवण्याची धमकी देत होता. त्याने वेगवेगळ्या प्रसंगी महिलेकडून 25 लाख रुपये उकळले.
‘मला आता तुझ्यात रस राहिलेला नाही, तुझ्या….’
दोन महिन्यापूर्वी आरोपीने महिलेला दिंडोली तळ्याजवळ बोलावलं. तिथे पुन्हा त्याने अत्याचार केला. महिन्याभरापूर्वी आरोपीने महिलेला सांगितलं की, ‘मला आता तुझ्यात रस राहिलेला नाही, तुझ्या मुलीची व्यवस्था कर’
नवऱ्याला कसं समजलं?
या सर्व प्रकारानंतर महिला टेन्शनमध्ये आली. पत्नी सतत तणावामध्ये दिसते, हे पतीने हेरलं. नवऱ्याने या बद्दल विचारल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. वकिलाचा सल्ला घेऊन पीडित महिलेने आणि तिच्या नवऱ्याने दिंडोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.