Income Tax Raid: 23 किलो सोनं, अब्जावधीची रोकड, नोटा मोजता मोजता थकले होते अधिकारी,बाचा सबीस्तर बातमी
कानपूरमधील प्रसिद्ध अत्तर व्यापारी पीयूष जैन यांचं नाव जेव्हा सोशल मीडियावर आलं होतं, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या अत्तर व्यावसायिकाच्या घरातून एवढा पैसा जप्त झाला होता की, नोटा मोजण्यासाठी अनेक मशीन मागवावी लागली होती. तीन दिवस चाललेल्या छापेमारीमध्ये दीडशे कोटींहून अधिकची रोख रक्कम आणि २३ किलो सोनं जप्त करण्याता आलं होते. त्यानंतर या व्यावसायिकाला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता या प्रकरणात सदर व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कानपूरमधील अत्तराचे व्यापारी पीयूष जैन यांच्या कानपूर आणि कन्नौज येथील मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यांमधून १९६ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि २३ किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. २३ किलो परदेशी सोनं जप्त करण्यात आल्या प्रकरणी डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्सने ही कारवाई केली होती. सीजेएम कोर्टामध्ये ही   माहिती डीआरआय अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी तुरुंगात गेलेल्या पीयूष जैन यांना २५४ दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पीयूष जैन यांच्या विरोधात जीएसटी कर अपवंचना डीजीजीआय आणि सोने तस्करीसाठी सुनावणी झाली होती. याच प्रकरणात आता विभागाने कारवाई करत पीयूष जैन आणि त्यांच्या फर्मवर दंडात्मक कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात फर्मचे प्रोपायटर काहीही बोलण्यास नकार देत आहेत. डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्स केस कारवाईनंतर खळबळ उडालेली आहे.