Income Tax Raid: आयकर विभागाकडून 15 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी, 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडून छापेमारी, काय आहे प्रकरण जाणून घ्या...
 
नाशिक : नाशिक शहरात आयकर विभागाच्या पन्नासहून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण पंधरा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे शहरातील बांधकाम व्यावसायिकांना रडारवर घेतलं आहे. आयकर विभागाच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या धाडीत नाशिक, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई येथील अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. आयकर विभागाला कर चुकविल्याचा संशय असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे नाशिकमधील बड्या बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाने रडारवर घेतल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहे.
नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात असलेल्या एका मोठ्या बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात हा छापा टाकण्यात आल्याचे प्रथमता समोर आले आहे. तर दुसरीकडे मुंबई नाका परिसरात असलेल्या कार्यालय असलेल्या बांधकाम व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक शहरात आत्ता पर्यन्त पंधरा व्यावसायिकांच्या कार्यालयात छापेमारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ही कारवाई असून आणखी बांधकाम व्यावसायिक रडारवर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक धास्तावले असून घाबराट निर्माण झाली आहे.
आयकर विभागाच्या जवळपास चार विभागातील अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे सकाळपासूनच ही कारवाई सुरू झाल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू असून बांधकाम व्यावसायिकांनी कर चुकविला आहे का? याशिवाय काही फसवणूक केली आहे का? अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
नाशिकमधील जवळपास सुरुवातीला पंधरा व्यावसायिक रडारवर घेतले आहे. त्यामध्ये बडे व्यावसायिक असून त्यांच्यावर काय कारवाई होते? काही घबाड त्यांच्याकडे आढळून येते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या छापेमारीवर संपूर्ण बांधकाम व्यवसायिकांचे लक्ष लागून आहे.