मुंबई APMC घाऊक बाजारात तूर डाळीच्या दरात वाढ

नवी मुंबई : गृहिणींना जेवणाच्या बाबतीत दररोज प्रश्न पडत असतात आज जेवणात कोणती भाजी बनवू हा प्रश्न सकाळ संध्याकाळ प्रत्येक गृहिणीला सतवीत असतो. एकीकडे काटकसर घरून घर सांभाळव लागत आणि दुसरीकडे वाढलेली महागाई . सध्या बाजारात भाज्यांच्या दारात वाढ झाली आहे त्याच बरोबर डाळींचे दर देखील वाढत चाले आहेत. सर्वात झटापटीने तूर डाळीचे दर वाढत आहेत. किरकोळ बाजारात तूर डाळ १५० रुपये किलो आहे मुंबई APMC धान्य मार्केट घाऊक बाजारात 
 
- तूर डाळ ७० ते १३० प्रतिकिलो 
- मसूर डाळ ५८ ते ७४ प्रतिकिलो
- चणाडाळ ५१ ते ६८ प्रतिकिलो
- मूग डाळ ९३ ते १२६ प्रतिकिलो
- उडीद डाळ ९० ते १२४ प्रतिकिलो 
- काबुली चणा ८८ ते १३२ प्रतिकिलो
- मसूर डाळ ६५ ते ७१ प्रतिकिलो
- सफेद वाटाणा ४८ ते ७२ प्रतिकिलो
- वाटाणा   ५० प्रतिकिलो
- राजमा ८० ते १३५ प्रतिकिलो
- हिरवा वाटाणा ५२ ते १०५ प्रतिकिलो
 
सरकारने वाढत्या महागाई कडे लक्ष दिले नाही डाळींचे भाव नियंत्रित ठेवले नाही तर सर्व सामान्यांना महागाई चा जोरदार चटका बसेल.