Maharashtra APMC Election Result : राष्ट्रवादीची भाजपाला साथ, काँग्रेसला ‘दे धक्का’, नाना पटोलेंना झटका
 
नागपूर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केलीय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कमजोर प्रदर्शनामुळे भाजपाला धक्का बसलाय. 147 पैकी 91 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादीने समसमान प्रत्येकी 25 बाजार समित्यांमध्ये विजय मिळवलाय.
काँग्रेसने सुद्धा या निवडणुकीत बऱ्यापैकी कामगिरी केलीय. पण सत्तेत असलेली शिवेसना आणि ठाकरे गटाला या निवडणुकीत विशेष प्रभावी कामगिरी करता आलेली नाही.
लाखनी कृषी उत्पन्न बाजार समिती का महत्वाची?
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भंडारा जिल्ह्यातील लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. लाखनी कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा क्षेत्रात येते. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.
काँग्रेसला फक्त किती जागा मिळाल्या?
18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीतला काँग्रेसला केवळ चार जागांवर विजय मिळाला. तर, भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 14 जागांवर विजय मिळविला. भंडारा इथं काँग्रेसचा 9 जागांवर विजय झाला. तर, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीनं 9 जागांवर विजय प्राप्त केला आहे.
नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी बाजार समितीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून, काँग्रेसचे नाना पटोले यांनी त्यांच्या गृह जिल्ह्यातचं सत्तेपासून दूर ठेवलं.