अलिबाग APMCचा भोंगळ कारभार 63 वर्षापासून अलिबाग APMC मध्ये स्वतःचे मार्केट यार्ड नाही!
अलिबाग: राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे .. आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागलेत.. प्रत्येक राजकीय पक्ष   निवडून येण्यासाठी शेतकरी , व्यापारी   आणि नागरिकांना भलीमोठी आश्वासने देतात मात्र त्यांच्या पोकळ आश्वासनांची कधीच पूर्तता होत नाही.. तशीच काहीशी परिस्थतीती पाहायला मिळत आहे जिथे आश्वासन पूर्ण होणे तर दूरच मात्र येथील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी स्वतःचा गाळा   देखील नाहीये येथील शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावर बसून विक्री करत आहे   ..ही दयनीय स्थिती आहे अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीची... अलिबाग बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना   आपला शेतमाल विकायला ना गाळे आहेत ना मार्केट यार्ड .. बाजार समितीचे कार्यालय देखील भाडेतत्वार दिले आहे .. हि अशी विकट परिस्थिती असताना अलिबाग बाजार समिती निवडणूक लढते तरी कशाला का याचा नफा फक्त संचालकाच्या खिशाला पाहुयात या व्हडिओ मध्ये... 
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समिती ६३ वर्षांपासून व्यपाऱ्यांकडून सेस घेतात ,लाइसेन्स नूतनीकरण करतात मात्र शेतकरी आणि व्यपाऱ्यासाठी स्वतःच मार्केट यार्ड नसल्याने अलिबाग बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे की शेतकरी कामगार पक्षासाठी अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या उमेदवारांनी दिली आहे .. या बाजार समितीवर ६३ वर्षापासून शेतकरी कामगार पक्ष्याचे   वर्चस्व राहिलेलं आहे.... यावेळी ही शेकापने १८ उमेदवार अर्ज विविध प्रवर्गातून भरले आहेत. यंदा शिंदे गटानेही या निवडणुकीत उडी घेऊन सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. बुधवारी ५ एप्रिल रोजी छाननी प्रक्रिया सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सुरू झाली होती . यावेळी शेकापच्या उमेदवारांनी एकत्रित अनामत रक्कम भरल्याची पावती देण्यात आली होती . प्रत्यक्षात प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र पावती असणे आवश्यक आहे. असे असताना एकत्रित पावती दिल्याने शिंदे गटाने निवडणूक अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवला आहे . दरवेळी सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येतात मात्र यावेळी शिंदे गटाचे उमेदवार उभे राहिले आहेत.. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांना निवडणुक प्रक्रियेमधून बाहेर काढण्यासाठी आणि ही   निवडणुक बिनविरोध करण्यासाठी निवडणूक अधिकारी व शेतकरी कामगार पक्ष्याचे उमेदवार   यांनी जोरदार प्रायत्न सुरु केले आहे.. आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाध्यक्ष राजेश केणी यांनी अलिबाग बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रियावर आक्षेप घातला असून यावर स्थगिती मिळावी अशी न्यायालयात दाद मागितली आहेत . तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अलिबाग तालुका बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.. ज्या बाजार समितीमधे स्वतःचे मार्केट यार्ड नाही ते उमेदवाराला सांगतात कि पावती आणा पण मार्केट यार्डच नाही तर पावती आणणार कुठून ? स्थानिक   बाजार समितीच्या निवडणुकांबद्दल शेतकरी व व्यापाऱ्यांच्या कानाला खबर देखील लागलेली नाही ...   मात्र   सध्या शिंदे गटाने उडी मारल्याने अलिबाग कृषी उत्पन्न बाजार   समितीवर ६३ वर्ष वर्चस्व   असलेल्या शेकापच्या हातून सत्ता   राहणार कि जाणार   ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे