गटार लाइनची सफाई नव्हे ही तर Apmc च्या तिजोरीची सफाई
 
-मार्केटमध्ये फक्त बॅनर बाजी पण कामांच्या बाबतीत हाजी हाजी
-Apmc प्रशासनाने त्वरित नाले सफाई करावी बाजार घटकांची मागणी
Mumbai Apmc: आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट हे APMC मार्केट ... मार्केट मोठं आहे पण सुविधांच्या नावाने बोंबच बोंब.... किती हि संचालक मंडळ नवीन आले तरीही मार्केट मध्ये सुधारणा नाहीच.... 
मुंबई Apmcच्या   पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह अन्य काम यंदाही कागदावरच राहिली आहेत. पावसाळ्यापूर्वी कामासाठी पणन संचालकांकडून   २० लाख रुपये मंजूर होऊन सुद्धा काम कागदावरच दिसून येत आहे. 
Apmc प्रशासनाने ७० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. कामे अपूर्ण असल्याने यंदाही पावसाळ्यात बाजार घटकाना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे
.
काही दिवसापूर्वी मसाला मार्केटमधील गटारलाइनच्या सफाईचा   फोटो बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी यांनी १० दिवसापूर्वी   एका ग्रुपवर   टाकल्याने   सर्वाने कौतुक केली मात्र त्या जागेवर गटार लाइनचे   कामाची Apmc News ने फॅक्ट चेक केली असता गटार लाइनच्या घाणीचं साम्राज्य पाहून व्यापारी आणि माथाडी कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे गटार लाइनची सफाई   नव्हे ही तर Apmcच्या तिजोरीची सफाई असा गंभीर आरोप यावेळी बाजार घटकांनी केला.
कांदा बटाटा व मसाला मार्केटमधील पॅसेज आणि धक्यावर पावसाच्या पाणी साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे नाल्यात असणारे ड्रेनेज चेंबर देखील ब्लॉक झाले आहे,या थोड्याच पावसात   गटार लाईन मध्ये   पाणी तुंबत मग जेव्हा जोरदार पाऊस होईल तेव्हा मार्केटची परिस्थिती आधी सारखीच राहील का असा प्रश्न उपस्थित राहिलाय ? गटाराची साफ सफाई न झल्याने कचऱ्या मुळे पावसाचे पाणी निचरा होत नाही त्यामुळे येणाऱ्या पावसात व्यापारी ,माथाडी कामगार आणि वाहतूकदारच्या   भीती वाटतं आहे येणारे पावसाचे दिवस बघता   Apmc प्रशासनाने त्वरित नाले सफाई करावी जेणे   करून बाजार घटकाना अडचणी होणार नाहीत.