पवार साहेब की अजित दादा! मुंबई APMC संचालक मंडळात फूट ? दोन्ही गटाकडून फोनाफोनी सुरू
सभापती पदासाठी काही पण…
Mumbai Apmc Director: राज्याच्या राजकारणत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं आज मुंबईत शक्तिप्रदर्शन होत आहे. शरद पवार आणि अजित पावर यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. पण यामुळे मुंबई APMC संचालक मंडळ संभ्रमात सापडला आहे. सभापती अशोक डक व संचालक   मंडळ नेमके कुणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांचं आज मुंबईत शक्तिप्रदर्शन आहे. शरद पवारांनी आज राष्ट्रवादीची मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावलीय. राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिका-यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजित पवारांसह गेलेल्या आमदारांनाही परत येण्याच्या अल्टिमेटमचा आजचा   अखेरचा दिवस आहे. तर दुसरीकडे आजच अजित पवारांनीही मोठं शक्तिप्रदर्शन करण्याचं ठरवलंय. वांद्रे एमईटी इथे त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आल आहे. राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मोठे पदाधिकारी यांना या बैठकीचं निमंत्रण आहे. स्वतः अजित पवारांनी या बैठकीला येण्याचं निमंत्रण दिलंय. तर दुसरीकडे शरद पवारांचा उद्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्याचवेळी अजित पवारांनीही भव्य मेळावा घेण्याची हाक दिलीय. त्यामुळे आता कोणत्या गटाकडे खरी ताकद आहे हे उद्याच मुंबईत दिसून येईल. या दोन्ही पवारांच्या फुटीमुळे संचालक मंडळ कोणाच्या बाजूला जाणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे .
मुंबई Apmcचे कार्यवाहू सभापती अशोक डक ३ दिवसापासून अजित पवारांसोवत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्यासोबत अजून काही संचालक देखील आहेत, मात्र दुसरीकडे शरद   पवार यांच्या कट्टर समर्थक व आमदार शशिकांत शिंदे सध्या शरद पवार सोवत आहेत तसेच   विदर्भाचे काही संचालक देखील शरद पवार यांच्या सोवत आहेत त्यामुळे दोन्ही पवारच्या फुटीमुळे संचालक मंडळ संभ्रमात आहे . उद्या दोन्ही पवारांच्या शक्ती प्रदर्शन मधे कोण संचालक कोणाकडे जाणार   ते बघायला मिळणार आहे .सध्या मुंबई Apmc मधे ६ महिन्यापासून   संचालक मंडळाला सभापती नसल्याने संचालक मंडळाची शासन व न्यायालय दरवारी लढाई सुरु आहे. 
राष्ट्रवादी नेते अजित पवार शिंदे फडणवीस सरकार मधे शामिल झाल्याने अजित पवारांना सहकार खात मिळाल्यास अशोक डक यांना पुन्हा   सभापती होण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत, मात्र डक याना दुसऱ्या टर्म मध्ये सभापती पदावर बसवण्यासाठी शरद पवार गट विरोध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .सध्या सर्वांचे लक्ष्य सहकार खात्यात आहे सहकार खाता कोणाकडे जातात त्याचे बाजूने सगळे संचालक मंडळ जाणार अशी चर्चा बाजार आवारत सुरू आहे .