कृषीकन्येचा घणाघात!“कोकाटेंना कृषी नाही, क्रीडा खातं देणं म्हणजे सरकारचं बक्षीस

*कृषीकन्येचा घणाघात!“कोकाटेंना कृषी नाही, क्रीडा खातं देणं म्हणजे सरकारचं बक्षीस!”
-दत्तात्रय भरणेंच्या घोषणाही हवेतच, शेतकऱ्यांचं वास्तव वेगळंच – प्रियंका जोशींचा खोचक टोला
-“कृषी खातं हे प्रयोगाचं मैदान नाही!” – सरकारवर जोरदार टीका
-जोशींच्या या थेट शब्दांनी महायुती सरकारची अडचण वाढलीय का?
-कृषी मंत्री नव्हे, क्रीडा बक्षीस! प्रियंका जोशींचा कोकाटे-भरणेंवर जोरदार हल्ला”
धुळे ,एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : कृषीकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंका जोशी यांनी आजी-माजी कृषी मंत्र्यांवर जोरदार शब्दबाण सोडले आहेत. नुकत्याच मंत्रिमंडळ विस्तारात माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून त्यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना जोशी म्हणाल्या, “कोकाटेंना कृषी मंत्रालयातून हटवून क्रीडा मंत्रिपद देणं हे सरकारकडून त्यांना मिळालेलं बक्षीस आहे!”
याचबरोबर, सध्या कार्यरत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारताच दिलेल्या विधानावरही प्रियंका जोशी यांनी टीका केली. “भरणेंनी कृषी धोरण न समजता फक्त घोषणा केल्या, पण शेतकऱ्यांच्या अडचणींना कोणतंही धोरणात्मक उत्तर दिलं नाही,” असं त्या म्हणाल्या.
महायुती सरकारवर निशाणा साधताना जोशी म्हणाल्या की, “कृषी मंत्रालय हे प्रयोगाचं मैदान नाही. शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळ करणं बंद करा!” प्रियंका जोशींच्या या घणाघाती टीकेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
#PriyankaJoshi #ManikraoKokate #DattaBharne #Mahayuti #ShivSenaUBT #Kisan #Politics #Agriculture #MaharashtraPolitics #ViralNews #APMCNews