मूल APMCच्या सभापतीपदी राकेश रत्नावार तर उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांची बिनविरोध निवड
मूल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राकेश रत्नावार तर राजेंद्र कन्नमवार यांची उपसभापती म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली आहे. Rakesh Ratnawar was elected as Chairman of Agricultural Produce Market Committee and Rajendra Kannamwar as Deputy Chairman.
18 संचालक असलेल्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणुक 28 एप्रिल रोजी पार पडली. यानिवडणुकीत संतोष रावत गटाचे 17 संचालक निवडुण आले होते. आज (शुक्रवार) सभापती, उपसभापती निवडणुक बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश रत्नावार यांची सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली आहे तर उपसभापतीपदी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजेंद्र कन्नमवार यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणुक प्राधिकृत अधिकारी म्हणुन तुपट होते.