कराड बाजार समितीवर बाळासाहेब पाटील याना धक्का,काँग्रेसचा विजय
 
कराड : कराड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये राष्ट्रवादीचे दिगज नेते व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजप सोबत युती केल्याने त्याच्या पॅनलला ६ जागे मिळाली   आहे तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उंडाळकर रयत पॅनेलचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत त्र्यामुळे बाळासाहेब पाटील महाविकास आघाडीच्या नेत्या असताना भाजप सोबत युक्ती केल्याने त्यांना महाग पडली आहे त्यामुळे बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्याने नाराजी होऊन रयत पॅनलला मतदान केली आहे ..
कराड शेती उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने सत्ता अवधीत ठेवण्यात यश मिळवले आहे अटीतटीच्या झालेल्या लढतीत माजी मंत्री विलासराव पाटील कारखाना बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सोमवारी कराड बाजार समिती निवडणुक मतमोजणी झाली.
कराड शेती उत्पन्न बाजार समिती सत्ता राखण्यात उंडाळकर पृथ्वीराज चव्हाण गटाला यश मिळाले.
माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उंडाळकर रयत पॅनेलचे 12 उमेदवार विजयी झाले. तर माजी सहकार   मंत्री बाळासाहेब पाटील व डॉ अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनलचे 6   उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर रयत पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.