देशातील बाजारात तुरीची आवक कमीच बाजारभावात तेजीच
देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. ऐन हंगामात तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळं सरकारही ॲक्शन मोडमध्ये आहे.
पण तरीही सरकरला तुरीचे दर करता आले नाहीत. तुरीचे दर सध्या ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
देशातील तुरीची काढणी आता पूर्ण झाली. पण बाजारातील तूर आवक नगण्य पातळीवर आहे. मागील काही दिवसांपासून आवक स्थिर दिसते. तर लग्नसराई आणि सण समारंभामुळे तुरीला चांगाल उठाव आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत.
यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादन यंदा ३२ लाख टनांच्या आतच्या राहण्याचा अंदाज आहे. पण देशातील लागवड कमी झाल्यापासूनच तुरीच्या दरात तेजी आली. गेल्या हंगामात तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी होते. पण लागवडी जशी कमी झाली तसे तूर भावाने उभारी घेतली.
देशातील तूर दर सध्या ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीचे दर ऐन हंगामात तेजीत आल्याने सरकारही बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकारने तुरीचे दर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या.
पुढीलवर्षी लोकसभेसह काही राज्यातील निवडणुका आहेत. त्यामुळे सरकार ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतीमालाचे भाव दबावातच ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी सरकार व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि उद्योगांवर दबाव आणत आहे.
सरकारच्या दबावामुळं उद्योग आणि स्टाॅकीस्टही गरजेप्रमाणं काम करत आहे. पण बाजारातील आवकच कमी असल्यानं दबाव नाही.