३४ मजुरांना घेऊन जाणारी पीक अप पलटली, घडली ही दुर्दैवी घटना
गोंदिया : धान्याच्या जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. गोंदिया जिल्ह्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी हे शेतीच्या कामाकडे वळले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पूर्वी धान बिजाची रोपणी केली आहे. पाण्याचे साधन आहे अशा शेतकऱ्यांचे धान पीक हे रोवणीसाठी तयार झाले आहे. अशाच रोवणीच्या कामाकरता मोठ्या प्रमाणामध्ये मजूर हे लागतात. अशाच मजूर महिलांना घेऊन जाणारे पिकअप पलटी झाले. या अपघातात 34 महिला आणि पुरुष जखमी झाले. ही घटना देवरी तालुक्यातील शिलापूर येथे घडली.
रोवणीसाठी जात होत्या महिला
गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक रोवणीचे काम हे पाऊस थांबल्यानंतर सुरू झाले आहे. या रोवणीच्या कामाकरिता मोठ्या प्रमाणात मजूर महिलांचा उपयोग जिल्ह्यात केला जातो. या मजुरांना आवागमन करण्यासाठी विविध साधनांचा उपयोग केला जातो. असेच देवरी तालुक्यातील बोरगाव इथून काही महिला या रोवणी कामाकरिता शिलापूर शेतात जात होते.
१४ महिला अतिगंभीर
एकाच पीक अप वाहनामध्ये 34 महिलांना कोंबून भरलेलं होतं. पीक अप रोडच्या कडेला पलटी झाले. यात 34 महिला आणि पुरुष जखमी झाले. त्यापैकी 14 महिला अतिगंभीर आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलेला आहे. उर्वरित महिलांवर उपजिल्हा रुग्णालय देवरी येथे उपचार सुरू आहे. अनेक महिला आणि पुरुषांना गंभीर जखमा झाल्यात. अनेकांचे हात, पाय, खांदे यामुळे फॅक्चर झाले आहेत, अशी माहिती डॉक्टर सागर नसिने यांनी दिली. आतातरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अशा प्रकारच्या वाहतुकीवर आळा घालावा, हीच अपेक्षा आता नागरिक करत आहेत.
बोरगाव (डवकी) येथील मजूर आज सकाळी दहा वाजता फुक्कीमेटा येथे जात होत्या. चालकाचे पीकअपवरील नियंत्रण सुटले. जखमी मजुरांना देवरी येथील प्राथमिक उपचार करण्यात आले. फुक्कीमेटा येथील शेतकरी संतोष ब्राम्हणकर यांच्या शेतात पीक अपमध्ये बसून धानाची रोवणी करायला जात होते.
रस्ता खराब असल्याने संताप
पीक अप चालक प्रवीण राऊत यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मजूर जखमी झाले. जखमींपैकी फुलन घासले, सयोगीता नंदेश्वर, विफुला साखरे, अनिता ठाकरे गंभीर जखमी आहेत. डवकी ते फुक्कीमेटा रस्ता पूर्णपणे खराब आहे. रस्ता खराब नसता तर अपघात झाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहन चालकाने ३३ महिलांना बसवून मजुरांचा जीव धोक्यात घातला.