खानदेशात निर्यातीच्या केळीचे दर २८०० ते ३००० रुपये
खानदेशात निर्यातीच्या केळीचे दर २८०० ते ३००० रुपये
खानदेशात निर्यातीच्या केळीचे दर २८०० ते ३००० रुपये प्रति 'क्विंटल, असे आहेत. केळीला निर्यातीसाठी मागणी असली तरी आवक मात्र   कमी आहे. रोज ८८ ते ९० ट्रक आवक होत आहे. यंदा मार्चमध्ये आवक वाढेल, असे संकेत आहेत. निर्यातीच्या किंवा दर्जेदार केळीला राज्यात ३००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. निर्यातदार कंपन्या खानदेशात खरेदी करीत आहेत. सध्या रोज तीन कंटेनर केळीची खानदेशातून परदेशात निर्यात होत आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात निर्यातीची केळी अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत. यामुळे या भागात एक ते दीड कंटेनर केळी रोज उपलब्ध होत आहेत. तर रावेर, यावल व चोपडा भागात मिळून दीड ते दोन कंटेनर केळी निर्यातीसाठी उपलब्ध होत आहेत. निर्यातीच्या केळीचे दर मध्यंतरी किंवा मागील आठवड्यात ३१२५ रुपये प्रति क्विंटल, असे होते. त्यात काहीशी नरमाई आहे. पण किमान दर २८०० व कमाल दर ३००० रुपये प्रति आहेत..