तुरीचे दर ओलांडणार, 9 हजारांचा टप्पा गाठणार ! सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
अकोला   : राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक चांगली असून दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील दहा दिवसांत बाजारात १० हजार ४०३ इतकी क्विंटल तुरीची खरेदी झाली. त्यावेळी बाजारात तुरीला ८ हजार रूपयांपेक्षा अधिक दर मिळाला आहे.. तूर दरवाढ सुरु असल्यानं लवकरच ९ हजारांचा टप्पा ओलांडला जाईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.सध्या लग्नसराई,सण - समारंभ यामुळे तुरीला चांगला उठाव आहे ..त्यामुळे दर तेजीत आहे .. सद्यस्थितीत मिळत असलेल्या तुरीला भाव पांढर सोनं म्हणजेचं कापसाच्या तुलनेत जादा आहे. आज अकोल्याच्या बाजारात १ हजार २१ इतकी क्विंटल तूर खरेदी झाली आहे. देशातील बाजारात सध्या तुरीची आवक कमी आहे. त्यामुळे   तुरीला सध्या चांगाल भाव मिळतोय. त्यातच यंदा उत्पादन घटल्यानं तुरीचे दर ९ हजारांचा टप्पा गाठू शकतात, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्च महिन्यात मध्यंतरी तुरीला चांगला भाव होता. परंतु, एप्रिलच्या सुरुवातीला तुरीच्या दरात सातत्याने खाली गेले होते. अकोल्यात ३ एप्रिल रोजी तुरीचे भाव ३४५ रुपयांनी घसरले होते. त्यामुळे या दिवशी तुरीला ७ हजार पासून ८ हजार ४५० रूपयांपर्यंत भाव होता. ५ एप्रिल रोजीही तुरीचे दर १२५ रुपयांनी घसरले होते. त्यामुळं तुरीच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात चांगली सुधारणा झाली.
५ एप्रिलपासून कालपर्यत ४०५ रुपयांनी तुरीच्या दरात वाढ झाली आहे. आजही तुरीच्या दरात क्विंटलमागं ६० रुपयांपर्यंत वाढ झाली. सध्या तुरीला सरासरी भाव ८ हजार रुपयांपर्यंत मिळतोय. तर जास्तीत जास्त ८ हजार ८३० रुपयांपर्यंत भाव आहे. दरम्यान, काल अकोटच्या बाजारात तुरीला ७ हजार ९०० ते ८ हजार ७४० रूपये इतका भाव मिळाला होता.दरम्यान, आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला ४ हजार पासून ८ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटरप्रमाणे भाव होता. तर सरासरी भाव ४ हजार ६०० रूपये इतका होता. पांढऱ्या हरभऱ्याला ७ हजार ३०० पासून ७ हजार ३४५ प्रतिक्विंटर प्रमाणे भाव मिळाला. आणि लोकल गव्हाला १ हजार ९८० पासून २ हजार ६१० प्रतिक्विंटल मागे भाव मिळाला.