धुळ्यात तुर्कीच्या बाजरीचा प्रयोग यशस्वी - लाखोंचं उत्पन्न
तुर्कीची बाजरी नाव ऐकून थक्क झालात ना ? राज्यात नवं नवीन प्रयोग   शेती बाबतीत   शेतकरी बांधव करीत असतो. धुळे तालुक्यातील बोरीस येथील शेतकरी डॉ. अनिल जैन यांनी शेतीत नवीन   प्रयोग करत तुर्की या उन्हाळी बाजरीची पेरणी करून यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवलंय. अनिल जैन यांनी दहा एकर शेतात विविध प्रयोग करत यंदा या बाजरीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. या बाजरीची उंची 10 ते 11 फुटांपर्यंत वाढली असून यात 3 फुटांपेक्षा अधिक लांबीची कणसे आली आहेत. अधिक लांबीची कणसे आणि परिपूर्ण भरलेले दाणे यामुळे त्यांना एका एकर मध्ये 30 क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन   आणि उत्पन्नही लाखोंच्या घरात आहे.