लग्नात बिन बुलाये मेहमान हाजीर
कोल्हापूर: लग्न कार्य म्हणजे आनंदाचा क्षण या साठी नातेवाईक , पाहुणे सारेच उत्सहात असतात. पण कोल्हापुरात लग्न कार्यात बिन बुलाये मेहमान येऊन लग्न कार्यात विघ्न आणलय. कोलापूरमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. गांधीनगर मधील आहुजा लॉन मध्ये लग्न समारंभ सुरु होता त्याच दरम्यान पावसाने विघ्न आणलं. वादळी पावसाने लग्नाच्या मंडपाचे पत्रे उडून गेल्याची आणि मंडप कोसळल्याची घटना घडली. काही जण यामध्ये जखमी झाल्याचीही माहिती समजते. तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात दाखल केले.