16 MLA Disqualification Case | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महत्वाची अपडेट
मुंबई : शिवसेनेत मागच्यावर्षी बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार बाहेर पडले. त्यांनी भाजपासोबत आघाडी करुन नवीन सरकार स्थापन केलं. त्यावेळी शिवसेना आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याची सातत्याने मागणी केली जात आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 15 आमदारांना नोटीस बजावली होती. आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली.
काय होऊ शकत या प्रकरणात?
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 40 आमदारांनी मुदतवाढ मागितलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण कुठेतरी लांबणीवर पडण्याचा शक्यता आहे. 10 ऑगस्टपर्यंत निर्णय दिला जाणार, अशी चर्चा होती.
आता सर्वकाही विधानसभा अध्यक्षांवर
काल विधानसभा अध्यक्षांनी नोटीसींचा आढावा घेतला. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आमदारांनी मुदत वाढवून मागितली आहे. आमदारांना नोटीस दिली होती. त्यांनी उत्तर दिलय. आमदारांच्या मागणीला विधानसभा अध्यक्ष कसा प्रतिसाद देतात, ते बघाव लागेल.