महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77 % मतदान, वाचा संपूर्ण आकडेवारी
मुंबई:लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडत आहे. यावेळी 8 राज्यासह एका केंद्रशासित प्रदेशातील 49 लोकसभा जागांवर मतदान पार पडत आहे. तर सहावा टप्पा 25 मे रोजी 7 राज्यातील 57 जागांवर, शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात उत्तर पदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहार आणि ओडिसातील पाच-पाच, झारखंड-जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये एक-एक जागेवर मतदान होत आहे.
पाचव्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाच्या पाच केंद्रीय मंत्र्यांचं भविष्य ठरणार आहे. दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही मतदारांच्या कसोटीवर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह-लखनऊ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी - अमेठी, केंद्रीय मंत्री कौशल किशोर - मोहनलालगंज, केंद्रीय मंत्री भानु प्रताप सिंह वर्मा - जालौन, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती - फतेहपूर लोकसभा जागेवर निवडणुकीच्या रणांगता आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रायबरेलीतून परीक्षा होणार आहेत. राहुल गांधी यांच्यासमोर भाजपने राज्य सरकारचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दिनेश प्रताप सिंह 2019 मध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात अपयशी झाले होते.
दुपारी 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती मतदान?
दुपारी 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 38.77 % मतदान झालं आहे. दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक तर कल्याण लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंत सर्वात कमी मतदान झालं आहे. मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहूया
धुळे - 39.97 %
दिंडोरी - 45.95 %
नाशिक - 39.11 %
पालघर - 42.48 %
भिवंडी - 37.06 %
कल्याण - 32.43 %
ठाणे - 36.07 %
मुंबई उत्तर - 39.33 %
मुंबई उत्तर पश्चिम - 39.91 %
मुंबई उत्तर पूर्व - 39.15 % 
मुंबई उत्तर मध्य - 37.66 %
मुंबई दक्षिण मध्य - 38.77 %
मुंबई दक्षिण - 36.64 %