मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक, वाचा कोण-कोण उपस्थित?
त्रुटी काढून आम्ही मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
नेत्यांच्या घरावर हल्ले झाले, पोलिसांनी भूमिका घेतली पाहिजे – जयंत पाटील
राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, असे सर्वपक्षीय नेत्यांचं मत असून नेत्यांच्या घरावर हल्ले झाले, पोलिसांनी भूमिका घेतली पाहिजे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेतली
-आक्रमक सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
-मंत्रालयाबाहेर सर्वपक्षीय आमदार आक्रमक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी करत मंत्रालयाबाहेर सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी मंत्रालयाला ठोकले टाळे
-आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत - मुख्यमंत्री शिंदे
आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. तर त्रुटी काढून आरक्षण देऊ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे. आणि त्याची तारीख लवकरच मिळणार आहे.
-राज्याने मिळून आरक्षणावर तोडगा काढावा - विजय वडेट्टीवार
मराठा आरक्षणावर केंद्र काही मदत करणार का? असा सवाल करत केंद्र आणि राज्याने मिळून आरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
-राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली - अंबादास दानवे
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, असे म्हणत राज्याचे विरोध पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
-सर्वपक्षीय बैठकीत दोन्ही विरोधी पक्षनेते आक्रमक
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार या दोन्ही विरोधी पक्षनेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर आरक्षणावर राज्याने केंद्राशी संपर्क केलाय का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
-त्रुटी काढून आम्ही मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी त्रुटी काढून आम्ही मराठा आरक्षण देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली
-मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या - बच्चू कडू
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या अशी मागणी केल्यानंतर याला पाठिंबा दर्शवत मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले दिले पाहिजे, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी सरकारकडे केली आहे.
-जरांगे पाटील यांचं आंदोलन हातळण्यात सरकार कमी पडंल - अशोक चव्हाण
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हातळण्यात सरकार कमी पडल्याची टीका करत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
-मराठा आरक्षणावर केंद्राने हस्तक्षेप करावा - अशोक चव्हाण
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी मराठा आरक्षणावर केंद्राने हस्तक्षेप करावा, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.