Big Breaking: तिढा सुटला नाही तर तीन इंजिनचं सरकार कोसळणार? बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार हे आता तीन इंजिनचं सरकार बनलं आहे, असा उल्लेख सत्ताधारी नेत्यांकडून केला जातोय. पण असं असलं तरी या सरकारमधील मित्रपक्षांमध्ये किंतू-परंतू असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप पार पडलेला नाही. या विस्तारासाठी सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे. पण तरीही राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि खातेवाटपाता तिढा सुटताना दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गेल्या तीन दिवसांपासून या विषयावर खलबतं सुरु आहेत. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठका पार पडत आहेत. पण तोडगा निघत नाहीय. या दरम्यान सरकारमधील आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबईत थांबून मंत्रिपद मिळतं, असं नाहीय. थांबलं, मग घेरा टाकला, हा काही पूजापाठचा थोडी विषय आहे”, असं बच्चू कडू म्हणाले. ते अमरावतीला विमानतळावर आज दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं.
‘सरकार मजबूत होऊ शकतं किंवा तीन तिघाडा…’
“खातेवाटप आणि इतर गोष्टी आहेत, तीन इंजिनचं सरकार आहे. ते मजबूत होऊ शकतं किंवा तीन तिघाडा म्हणून बैकूपण शकतं. त्यामुळे जेवढं मजबूत होईल, तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील”, असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.
एकंदरीत चित्र असं आहे की, खातेवाटपावर काही गोष्टी, किंतू-परंतू असू शकतात. प्रत्येकाला असं वाटतं की, अजित पवार यांच्याकडे वित्त खातं नको जायला. कारण मागच्यावेळी त्यांनी जशाप्रकारे कारनामा केला तसं यावेळी सुद्धा घडू नये, अशी भीती आणि अपेक्षा आमदारांमध्ये आहे”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.
उद्धव ठाकरेंकडून सुरुवात, तर भाजपकडून शेवट’
“राजकारणात नवीन पॅटर्न आलाय. बदलत्या स्वरूपात आता पाच वर्षात काय-काय बदललं ते तुम्ही या पाच वर्षात बघितलं. सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी अनैसर्गिक युती केली. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना अशा तीन पक्षांचं सरकार त्यांनी स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं. आता त्याचा शेवट भाजप करत आहे”, अशी देखील प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली.
“अनेक आमदारांना त्यांच्या पत्नी विचारतात तुम्हाला मंत्री पदांसाठी फोन आला का? तुम्ही तर गुवाहाटीला गेले होते?”, अशी मिश्किल प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली. “जशी निकालाची वाट पाहता तशी फोनची वाट पाहणे सुरू आहे. प्रत्येकाला वाटतं मंत्री झालं पाहिजे. चांगल्या कॉलची कोणीही वाट पाहतं. यात वाईट काय?”, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.